दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 26 September 2024

Continues below advertisement

दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 26 September 2024

संजय राऊतांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा, २५ हजारांचा दंडही, मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यांच्या बदनामीच्या खटल्यात झाली शिक्षा...

शिवडी कोर्टाच्या निर्णयाला संजय राऊत सेशन कोर्टात आव्हान देणार, शौचालय घोटाळ्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या, मग माझ्याच आरोपांनी बदनामी कशी? सवाल

'राऊतांबाबत कोर्टाने सुनावलेल्या निकालावर मी समाधानी'.. मेधा सोमय्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया.. बदनामीचा शिक्का पुसल्याची,व्यक्त केली भावना... 

राजकोट शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनाप्रकरणी समितीचा १६ पानी अहवाल सादर... गंज, चुकीचं डिजाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा पडल्याचा उल्लेख.. दोषींवर कारवाईचं मंत्री उदय सामंतांचं आश्वास

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पोलिसांची नोटीस, पुतळ्याच्या कामात घोटाळा झाल्याच्या आरोपांसंबंधी चौकशीला बोलावले...

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकप्रकरणी सरकारला हायकोर्टाची आणखी एक चपराक, मतमोजणी थांबवण्यास नकार..

महायुतीमध्ये आता फक्त ९० जागांवर तिढा, १९८ जागांवर जवळपास मतैक्य, तिढा सोडवण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक..

शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ९० जागांवर लढण्याची शक्यता, १२०० इच्छुकांचे अर्ज दाखल, तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढणार नसल्याची स्टँपपेपरवर हमी..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, मेट्रोची नवी लाईन कधी सुरु होणार असा प्रश्न, काही दिवसांतच मोदींचा पुन्हा दौरा होण्याची शक्यता...

सीप्झ परिसरात मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून महिलेचा मृत्यू, तीन दिवसांत चौकशी करुन अहवाल देण्याची पालिका आयुक्तांचे आदेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram