ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर विरोधकांचा दबाव वाढला...सुप्रिया सुळे आणि संभाजीराजेंनी करून दिली नैतिकता आणि माणुसकीची आठवण...पुराव्यांवरून राऊतांची आगपाखड..

राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली, मंत्रिमंडळ बैठकीतही घेतला सहभाग...

दोन कोटींच्या खंडणीच्या आड आले आणि दलित व्यक्तीला मारहाण करताना मध्ये पडले म्हणून संतोष देशमुखांची हत्या, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप...आरोपींची अवस्था तेरे नामसारखी व्हायला हवी असं व्यक्त केलं मत...

लोकसभा, विधानसभेत शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती...महापालिका निवडणुकीत मनसे युतीबाबत सकारात्मक...

विधानसभेत झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश, विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना

महाराष्ट्रात ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले...ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram