Walmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त

Continues below advertisement

Walmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त

 खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. यासाठी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या MH 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर SIT ने कोर्टात दावा केला की, हीच गाडी वाल्मीक कराड यांनी फरार होताना वापरली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी स्कार्पिओ गाडी जप्त करुन केज पोलीस ठाण्यात कव्हर टाकून झाकून ठेवण्यात आली आहे. 

वाल्मिक कराड तब्बल 22 दिवास फरार

वाल्मिक कराड तब्बल 22 दिवास फरार होता. त्यानंतर 31 डिसेंबरला अचानाक तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराड स्वत: शरण का आला?, यामागचं नेमकं कारण काय?, अशी चर्चा रंगली आहे. परंतु वाल्मिक कराडने आत्मसमर्पण का पत्कारलं? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावेळी वाल्मिक कराडने पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येण्यासाठी जी गाडी वापरली होती, ती गाडी जप्त करण्यात आली आहे. ती गाडी केज पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram