ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
सैफच्या घरात घुसण्याआधी हल्लेखोराकडून अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी, शाहरुख सलमानच्याही घरांची मिळवली माहिती, सैफचा मुलगा जहांगीरचं अपहरण करुन मागणार होता खंडणी, सुत्रांची माहिती
पन्नास हजार रुपयांसाठी हल्लेखोराचा सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती... शरीफुलवर वरळीच्या कॅफेतही चोरीचा आरोप
हल्लेखोराच्या कबुली जबाबानंतर पोलिस गुन्ह्याचं नाट्यरुपांतर करुन बारकावे गोळा करणार, उपचारानंतर सैफच्या डिस्चार्जवर आज निर्णय
पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर.. महाराष्ट्र सरकारकडून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द
बीडचं पालकमंत्रिपद मिळाल असतं तर आनंदच झाला असता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य.. तर जालन्याच्या पालकत्वात सुखी असल्याचा दावा .. आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात बीडचा विकास झाल्याची आठवण