ABP News

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 04 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM टॉप हेडलाईन्स 04 ऑगस्ट 2024

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज सोलापुरातून सुरुवात होणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. 

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज, सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना...

आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली, मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान.. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी, काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला

पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे, जेलची हवा खाणाऱ्या सचिन वाझेचं फडणवीसांना पत्र, एएनआयच्या कॅमेऱ्यासमोर जयंत पाटलांच्या नावाचाही उल्लेख 

सचिन वाझेला कधीच भेटलो नाही, सचिन वाझेच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर वाझेचं बोलणं ही फडणवीसांची चाल, अनिल देशमुखांचा आरोप

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram