ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 04 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स न्यूज हेडलाईन्स 08 AM टॉप हेडलाईन्स 04 ऑगस्ट 2024

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 

खडकवासलातून विसर्ग २७ हजार क्युसेकपर्यंत वाढवला, मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, सुरक्षिततेसाठी काही घरांचा वीजपुरवठा बंद

राज ठाकरे मराठवाड्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, आज सोलापूरमधून दौऱ्याला सुरुवात, १३ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता

महाराष्ट्र काँग्रेसची आज मुंबईत बैठक, विधानसभेच्या जागावाटपाबाबत होणार चर्चा, रमेश चेन्नीथल बैठकीला राहणार हजर

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज, सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना...

आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली, मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान.. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी, काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram