ABP Majha Marathi News Headlines 06 PM 01 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स 06 AM टॉप हेडलाईन्स 01 ऑगस्ट 2021

कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक, खाशाबा जाधवानंतर महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...

कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक... लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष..तर राज्यभरातून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा सहा विरुद्ध एक असा निकाल, मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी अट..

जितेंद्र आव्हाडाच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंवरील 
वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला, पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार

आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram