
ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 20 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 20 March 2025
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असे असतानाच या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"मला नवल वाटलं की मागील दोन विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही. प्रत्येकवेळी अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या चौकशीचं काय? संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांच्या हत्येचं काय? दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण न्यायालयात चालू आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत ते न्यायालयात द्यावेत. जे काय आहे ते कोर्टात द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.