ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025
राज्यात नागपूरमधील (Nagpur) हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची (Aurangzeb) कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.
समाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सुनिल आबेडकर यांनी मांडली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागेतील स्मृतीभवनात जाणार का याबद्द्ल स्पष्टता नाही. मात्र, मी एक सांगू शकतो की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हेडगेवार स्मारकावर गेले होते, असेही सुनिल आंबेकर यांनी म्हटले.