ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

नागपूरच्या घटनेनंतर जालना पोलीस देखील सतर्क झाले असून, सोशल मीडियावर कोणतीही अफवा किंवा भडकाऊ पोस्ट पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा  इशारा जालना पोलिसांनी दिलाय . पोलीस प्रशासन सोशल मीडियावर बारकाईने नजर ठेवून असून कोणत्याही अक्षेपार्ह पोस्ट, किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्याना सोडणार नसल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे. काही दिवसापूर्वी शिवजयंतीचे शिवरायांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वायरल व्हिडिओ वरून पोलिसात गुन्हा दाखल झाला होता, यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचा आवाहनदेखील जालना पोलिसांनी केला आहे. (Nagpur Violance)

सोशल मीडियावर बारकाईने लक्ष

औरंगजेबाची कबर पाडा या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सोमवारी महाल परिसरात केलेल्या आंदोलनाला नागपूर मध्ये हिंसक वळण लागलं . दोन गटात झालेल्या राड्यात जमावाने तोडफोड जाळपोळ केल्याचे समोर आले . या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात शिवजयंतीदिवशी शिवरायांची प्रतिमा फाडल्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे जालना प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा अपर  पोलीस  अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola