ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 06 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा हेडलाईन्स 07 AM टॉप हेडलाईन्स06 September 2024
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात
राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा...एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका... तर आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीचा सवाल...
लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरुन महायुतीत रस्सीखेच, बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदेंचा फोटो, पण अजितदादांचा फोटो नाही
विधानसभेला ६० जागा लढवण्याची इच्छा, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य..तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवणार, अजितदादांची स्पष्टोक्ती
मविआचं जागावाटप होण्याआधीच ठाकरे गटाची मुंबईतल्या ३६ पैकी २२ शिलेदार ठरले...संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती...विद्यमान आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी...
((जागावाटपाआधीच ठाकरेंची 'सेना' तयार?))
बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर गोळीबार..जुन्यावादातून गोळीबार झाल्याची माहिती..एकजण गंभीर जखमी तर गोळीबार करणारा एकजण पोलिसांच्या ताब्यात