
ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024
ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भिती, तब्बल एक लाख कोटींची वित्तीय तूट भरुन काढण्याचं आव्हान, लाडकी बहिणमुळे वाढा बोजा..
धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझाकडून पडताळा, बॅटरी स्प्रेयर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा, दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच शिवाय यापूर्वी MAIDC नेच कमी किमतीत खरेदी केल्याचं उघड
बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप, व्हिडिओ पाहणाऱ्या धारुरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर जखम, मोहितेवर अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार, गुंड फरार
मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवहन मंत्र्यांना धक्का, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती, आयएएस बाबूकडे पहिल्यांदाच एसटीचं अध्यक्षपद
पंतप्रधान मोदीचं आज राज्यसभेत संबोधन, दुपारी ४ वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला देणार उत्तर, विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता
बहुचर्चित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची यंदा आठवी आवृत्ती, यावर्षी पंतप्रधान मोदींसोबतच सदगुरु जग्गी वासुदेव, दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, मेरी कोम, अवनी लेखरा, ऋतुजा दिवेकर, विक्रांत मेस्सी यांचा समावेश.