ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8 PM 26 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन, शिवप्रेमींची नाराजी
आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध, अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन
मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलानं उभारला होता, ताशी ४५ किमी वेगानं वारे वाहत होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
मुंबई-गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्य़वधाचा गुन्हा दाखल करा, पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिकेसह दोन सेविकांवर पोक्सो दाखल करा, शिक्षण विभागाच्या शिफारशी, पोलिसांच्या हलगर्जीपणावरही बोट
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर फिर्यादीच्या वतीनं असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल