ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 18 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 18 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
औरंगजेब कबर हटाओ आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा..दोन गटांत दगडफेक आणि जाळपोळ. आतापर्यंत ऐंशीपेक्षा जास्त संशयित ताब्यात.. परिस्थिती नियंत्रणात
कालच्या राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता; कोतवाली, गणेशपेठ, लकड़गंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाड़ा, यशोधरा नगर आणि कपिल नगर भागात संचारबंदी.. रात्रभर पोलिसांचं अटकसत्र
नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचा सायबर सेल अॅक्टिव..तब्बल दीड हजार सोशल मीडिया हँडलवर करडी नगर, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चित
नागपूरच्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आज करणार निवेदन.. राडा कशामुळे सुरु झाला, पोलिसांनी काय कारवाई केली, जबाबदार कोण.. यावर उजेड पडण्याची शक्यता
नागपूरचा राडा हा ठरवून केलेला प्रकार, स्थानिक आमदार प्रवीण दटकेंचा आरोप, संवेदनशील भागात पोलिस उशीरा पोहोचल्यांचा आरोप, पीआय संजयसिंगांना निलंबित करण्याचीही आमदारांची मागणी
कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरात राडा होणं अतिशय दुर्दैवी.. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया..दंगलखोर स्थानिक नसून, नागपूरबाहेरून आल्याचा प्यारे खान यांना संशय
राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन.. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचं आवाहन.