ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 21 September 2024
धारावीतल्या मशिदीविरुद्धची कारवाई स्थगित, बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली ५ दिवसांची मुदत, कारवाईपूर्वी बीएमसीच्या वाहनाची तोडफोड..
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, विदर्भ-मराठवाड्यातल्या ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा...
पुण्यातल्या खड्ड्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसुद्धा नाराज, २ आणि ३ सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला असं पुणे पोलिसांना खरमरीत पत्र...पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या सूचना..
सिनेटची निवडणूक रद्द करण्याविरुद्ध ठाकरेंची युवा सेना सोमवारी हायकोर्टात जाणार, आज आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक..
महायुतीमध्ये गेलो असलो तर फुल-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा, नितेश राणेंचा निषेध केल्याची करुन दिली आठवण..
राजानं प्रखर टीका सहन करावी आणि चिंतन करावं,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला..