ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 27 December 2024
एबीपी माझा हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 27 December 2024
बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप...महादेव अॅपचा उल्लेख करत मलेशियापर्यंत कनेक्शन असल्याचाही दावा..
संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा...कुटुंबीयांच्या पाठिशी उभं राहा, संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन...तर निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, मोर्चेकरांची मागणी..
संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा...शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात तर मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन...
बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरु, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप...अडीच वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कुणाची ते बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा...
धनंजय मुुंडेंची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली?, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा संतप्त सवाल...दमानिया, संजय राऊत,संदीप क्षीरसागर यांच्यावरही हल्लाबोल