ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 21 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8 Pm टॉप हेडलाईन्स 8 PM 21 ऑगस्ट 2024
बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद, तणावपूर्व शांतता, रेल्वेवाहतूक सुरू, बदलापूर आजही बंद, राज्यभरातही विविध भागांत आज आंदोलनाची हाक
बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, सकाळी ११ वाजता गोंदियात दाखल होणार, दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक, संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात
महाविकास आघाडीची आज बैठक, ट्रायडेंट हॉटेलमध्ये ११ वाजता बैठक, जागावाटपासंदर्भात होणार चर्चा
दिल्लीत अमित शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती, जागावाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा