ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 13 August 2024
लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं...अजित पवारांची कबुली...
विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती...
कुणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्या राणांना फडणवीसांनी सुनावलं, जळगावातल्या कार्यक्रमात कानपिचक्या
लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं...भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात...सह-सरकार्यवाहक अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी...
रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना
लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा ताशेरे...पुण्यातल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाची तंबी...
फडणवीसांच्या सांगण्यावरूनच भुजबळ काम करतात, नाहीतर पुन्हा जेलमध्ये टाकण्याची भुजबळांना भीती...नाशिकमधल्या रॅलीत जरांगेेंचा फडणवीस, भुजबळांवर पुन्हा घणाघात...