ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 10 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 10 May 2025

पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करुन येतंय, भारतीय सैन्यदलाची पत्रकार परिषदेत माहिती, भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

सिरसा, सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल, एअरबेसचे आजचे फोटो सादर करुन पाकिस्तानला उघडं पाडलं

भारताच्या ७ मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर, अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचाही खात्मा, मसूद अझरच्या मेहुण्यांसह टॉपच्या ५ दहशतवादांचा अंत

भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका, सुक्कूर, सरगोधासह सहा एअरबेससह भारतीय सैन्यकडून टार्गेट

पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा, एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख

 पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्यदल प्रमुख, सीडीएस आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात तासभर चर्चा, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींना दिली पुढील रणनीची माहिती

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola