India Pakistan War : पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड भारतीय सैन्याकडून नेस्तनाबूत

India Pakistan War : पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड भारतीय सैन्याकडून नेस्तनाबूत

किस्तानने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सीमेवरील तणाव वाढू लागलेला असताना ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कारवाईत पाकिस्तानचा प्रत्येक हवाई हल्ला भारताने चिरडून टाकला. जम्मू काश्मीरसह पंजाबमधील लष्करी आस्थापनांवर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला भारताने परतवून लावलं. (Indian Army) पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर शस्त्रसंधीचा भंग करून तोफांचा मारा सुरू केला होता. या हल्ल्यालाही चोख उत्तर भारतीय सैन्य दलाने दिले आहे. दरम्यान भारताच्या लष्करी सामर्थ्याची अभिमानास्पद कामगिरी, लष्कराच्या कारवाईचा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे.भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तणाव वाढत असतानाच जम्मू सह पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये ही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी ड्रोन हवेतच नष्ट करत भारतीय सैन्य दलाने आपल्या शस्त्रसिद्धतेचं दर्शन घडवलं . डोंगररांगांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात  दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हवाई हल्ले सुरू असताना किती तणाव असेल याची कल्पनाही भीतीदायक . एकीकडे हवाई हल्ले दुसरीकडे सैन्यदलाच्या  चोख आणि अचूक कारवाईचे दर्शन . शत्रुराष्ट्र असलं तरी तिथल्या नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी घेतलेली काळजी अशा कितीतरी बाबतीत भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola