ABP Majha Marathi News Headlines 11:00 AM TOP Headlines 17 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 11:00 AM TOP Headlines 17 April 2025

फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा, अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा..तर खोटं बोलण्याची लिमिट असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर

नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती, याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का घेतली नाही, अशी विचारणा, हायकोर्टाकडे मागवला खुलासा

श्रीगोंद्यातील संत शेख महंमद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धावरून वाद, वंशजांनी स्थापन केलेला सुफी संत हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट रद्द करण्याची मागणी, मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन

मनपा निवडणुका घेणे माझ्या हाती असते, तर उद्याच घेतल्या असत्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर, सुप्रीम कोर्टात ६ मे रोजी सुनावणी,तोपर्यंत काही करता येणार नसल्याची स्पष्टोक्ती

देशमुख हत्या प्रकरणावरून टिकेची राळ उठवणारे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची आज पुन्हा भेट होण्याची शक्यता, नारळी सप्ताहात एकाच व्यासपीठावर येण्याचे संकेत

मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा, पाणीटंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यान मनपा वॉर्डवर धडक

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola