Special Report Tanisha Bhise Case | तनिषा भिसे मृत्यूनंतर भिसे कुटुंबावर आरोपांची राळ

Continues below advertisement

Special Report Tanisha Bhise Case | तनिषा भिसे मृत्यूनंतर भिसे कुटुंबावर आरोपांची राळ

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटअभावी गरोदर महिलेला उपचार नाकारण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात (Deenanath Mangeshkar Hospital) संतापाची लाट उसळली होती. तसेच मृत तनिषा भिसे (Tanisha Bhise Death) यांच्या कुटुंबीयांवरही दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते. या सगळ्या आरोपांचे खंडन भिसे कुटुंबीयांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात भिसे कुटुंबियांना रेशन कार्डवरून ट्रोल करण्यात आलं आणि हेच रेशन कार्ड भिसे कुटुंबीयांनी  'एबीपी माझा'ला दाखवले 

आमदाराच्या पीएला 30 हजार पेक्षाही कमी मानधन असतं. आमदाराचा पीए म्हणजे सगळे वाईट काम करणारा नसतो अनेक आमदाराचे पीए प्रामाणिक काम देखील करतात. वार्षिक उत्पन्न 300000 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या स्वीय सहायकांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला आहे. आमदाराचा स्वीय सहाय्यक असला तरीही इमानदारीने काम करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे नसतात.ज्या दिवशी दीनानाथ रुग्णालयात दहा लाख रुपये मागितले, त्यादिवशी आम्ही जागेवर तीन लाख रुपये द्यायला तयार होतो आणि सात लाख रुपयांची व्यवस्था आमदार अमित गोरखे हे करत होते, असे भिसे कुटुंबीयांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola