ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 27 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 27 August 2024

मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला, दहीहंडी फोडण्यासाठी गोंविदा पथकाचे उंचच उंच थर... 

जय जवान पथक दहा थर लावण्यात अपयशी...चार वेळा प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी गोविंदा पत्त्यांच्या पानांसारखे कोसळले..

दहीहंडीच्या उत्साहाला सेलिब्रिटींचा तडका...जितेंद्र, करिश्मा, भाग्यश्री, सई ताम्हणकरसह अनेक कलांकारांची हजेरी..

गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटिंची हजेरी, तर गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके...

दहीहंडीत राजकीय नेत्यांचीही लगबग...विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार, तर स्वराज्यावर चालून येणाऱ्यांचा लोकशाही मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट...

पुण्यातही दहीहंडीचा उत्साह शिगेला, ढोलपथकाच्या तालावर अबालवृद्ध थिरकले...

शिवरायांच्या पुतळ्यावरुन मंत्री दीपक केसरकरांच्या विधानावरुन वाद, चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, केसरकरांचं वक्तव्य.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola