ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 06 December 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 05 PM 06 December 2024
शिवसेनेसमोर गृहमंत्रिपदाच्या बदल्यात तीन वजनदार खात्यांचा पर्याय...महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाबाबत शिवसेनेचा विचार सुरु असल्याची माहिती...
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठे बदल दिसण्याची शक्यता, कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार, सूत्रांची माहिती
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक, ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, उद्यापासून ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन
आमचं हिंदुत्त्व सर्वसमावेशक, मुस्लीमही आमच्या हिंदुत्वात, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची माझाला पहिली मुलाखत
एकनाथ शिंदेशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा आरोप, महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरु केलेलं सुडाचं राजकारण थांबवण्याचीही सूचना