ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 31 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 31 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
सैफ अली खान हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, सरकार गरिबांसाठी ३ कोटी नवी घरं बांधणार असल्याची माहिती
२०४७ च्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत पर्यंत भारत विकसित झालेला असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास, यंदाच्या सत्रात ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होणार असल्याचाही माहिती...
भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी, धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाही, महंत नामदेव शास्त्रींकडून पाठराखण
भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेवशास्त्रींना देणार, एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानियांची माहिती, येत्या दोन दिवसांत गौप्यस्फोट करणार, दमानियांचा दावा
जेसीबी काय, टायरही नावावर नाही, सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गुणरत्न सदावर्तेंशी बोलताना दावा, भास्कर केंद्रेची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत विश्व मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात उद्घाटन, काहीवेळाने शिंदे व्यासपीठावर दाखल