ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 20 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 20 August 2024

तब्बल १२ तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, काही आंदोलक ताब्यात

आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशनबाहेरील वाहनांची तोडफोड. जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खासगी गाडीही फोडली

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांवर आंदोलकांची दगडफेक, दगडफेकीत पोलीस जखमी

चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर बदलापुरात उद्रेक...आरोपीला आमच्यासमोर आजच फाशी द्या, आंदोलकांची संतप्त मागणी 

चिमुरड्यांवरच्या अत्याचारविरोधांत बदलापूरकरांची एकजूट...लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, मुलींना सुरक्षा द्या, आंदोलकांची भावना 

आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन

बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल निलंबित.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..

बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार...उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील...

बदलापुरातल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंतच...बदलापूरमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेंचा मार्ग वळवला...

दिल्लीत अमित शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती, जागावाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा 

काँग्रेसच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं...उद्या फोटो येणार, त्यासाठीच काँग्रेसचं उपरणं घातलं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola