ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 21 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलापूरमध्ये आज तणावपूर्व शांतता, रेल्वेवाहतूक सुरू, बदलापूर आजही बंद, राज्यभरातही विविध भागांत आज आंदोलनाची हाक
बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन
महाविकास आघाडीची आज बैठक, ट्रायडेंट हॉटेलमध्ये ११ वाजता बैठक, जागावाटपासंदर्भात होणार चर्चा
दिल्लीत अमित शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती, जागावाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा
काँग्रेसच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं...उद्या फोटो येणार, त्यासाठीच काँग्रेसचं उपरणं घातलं, उद्धव ठाकरेंचा टोला
मुख्यमंत्री शिंदे वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त आज रत्नागिरीत, विविध कार्यक्रमांना हजेरी, सकाळी १० वाजता चंपक मैदानात सभा