ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 13 JULY 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines  12 PM 13 JULY 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह दिल्लीला रवाना, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार, शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप, शरद पवार आणि मविआसोबत राहणार असल्याचाही उल्लेख

विधानपरिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, काही आमदारांना २ एकर जमीन, २० ते २५ कोटी रूपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप

नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल, मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा

संविधानावर प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी, प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान मोदी, राहुल गांधींना आव्हान, भाजप, काँग्रेसने संविधानावर वार केल्याचाही आरोप

पाणी भरल्याने मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, पुढील ३६ तासांत २०० मिमी पावसाची शक्यता, मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश, वीकेण्डला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला

एबीपी माझाच्या बातमीनंतर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांवर गुन्ह्याची नोंद 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram