ABP News

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर दिशा सालियनचे (Disha Salian) मृत्यू प्रकरण आज विधिमंडळात चांगलेच गाजले. याच मुद्द्यावर चर्चा होत असताना सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचाही संदर्भ आला. हाच संदर्भ देताना आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर चित्रा वाघदेखील चांगल्याच संतापल्या. यावरच शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता केलेली ही टीका सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय.  

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? 

सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपलं मत मांडलंय. 'सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत  एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!' असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडेच चर्चे होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram