ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ, आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची..
फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, बडे उद्योगपती आणि सिनेस्टार्ससह सेलिब्रिटींचीही हजेरी
शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये आता खातेवाटपाचा पेच, एकनाथ शिंदे गृहमंत्रालयावर ठाम, तर फडणवीस म्हणतात खातेवाटपावर एकमत
शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा...अजितदादांचा मात्र सहभाग नव्हता...
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन, ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड...फडणवीसांची माहिती...
भाजप १८ ते २० मंत्रिपदं आपल्याकडे ठेवण्याची शक्यता... शिवसेनेला १२ ते १३ तर अजित पवारांना ८ ते १० मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती...
डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, उपमुख्यमंत्रिपदाची शिंदेंकडून नवी व्याख्या...फडणवीस आणि अजितदादांना सहकार्य करण्याची हमी...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाणदिन. दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही करणार अभिवादन