ABP Majha Headlines : 7 AM : 31 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 7 AM : 31 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाओ रॅली, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांमध्ये वर्षावर पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक. जागावाटपावर खलबतं...
बारामती लोकसभेत नणंद-भावजयमध्ये लढत, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांमध्ये काँटे की टक्कर
शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, तर अहमदनगरमधून निलेश लंकेंना उमेदवारी, अमर काळे, भास्कर भगरेंनाही संधी
लोकसभेच्या जागावाटपाचा मविआतील तिढा अद्याप कायम, वादग्रस्त जागांसंदर्भात आज मविआ नेत्यांची सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत दिल्लीत बैठक
भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक, बैठकीत लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार, फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक
अंबादास दानवे ठाकरे गटातच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन, दोन ते तीन वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, १५ ते २० गोदाम जळुन खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी ५ ते ६ तास लागण्याची शक्यता.