
ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 25 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकराला तेलंगणातून अटक, कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना, आज कोर्टात हजर करणार
कुणाल कामरावर गुन्हा झाल्यानंतर खार पोलिसांची कामराला चौकशीची नोटीस, तर आपण कुठेही लपलो नाही आणि माफीही मागणार नाही.. कुणाल कामराचे अधिकृत स्टेटमेंट
उपमुख्यमंत्री शिंदेंचं विडंबन करणाऱ्या कुणाल कामराविरोधात सत्ताधारी आक्रमक, स्टँडअप कॉमेडी शोचं शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर
२०१४ मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत म्हणून युती तुटली.. १४७ जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे १५१ जागांवर अडून बसले, युती तुटण्याचं कारण सांगताना फडणवीसांची ठाकरेंवर टीका
मुंबईतील रस्त्यासंदर्भातील बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने, दोघांची सूचक देहबोली कॅमेऱ्यात कैद
नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती..सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका..तर जामीनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज..
धारावीमध्ये सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट.. अग्नीशमन दलाकडून तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात.. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र अवैध पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
सीबीएसई पॅटर्नसंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन.. २०२५ पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न