सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines : 6.30 AM Headlines : 16 Sep 2024
सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines : 6.30 AM Headlines : 16 Sep 2024
आजपासून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आंतरवाली सराटीत उपोषण.
विरोधकांनी दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनवरून समाचार
चाकरमान्यांना कोकणसंदर्भात जाणीव व्हावी म्हणून खड्डे तसेच, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन खासदार नारायण राणेंचा मिश्किल टोला
जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पत्नीचा हृदयविकारानं मृत्यु, पत्नी गेल्याची बातमी ऐकून झेडपीचा डेप्युटी सीईओ असलेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न...सीईओ छळत होते असा आरोप..
लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी सहा वाजल्यापासून बंद, तसेच मूखदर्शनाची रांग उद्या रात्री १२ नंतर बंद, तर पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी