ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 23 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 23 September 2024
राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याच्या बातम्या कपोलकल्पित, शेलार-बावनकुळे-सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, तर हा महायुतीचा अंतर्गत मामला, शरद पवारांची प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक, दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा...भेटीवर जोरदार तर्कवितर्क...
पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाहीतर हिसकावून घेऊ विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा सूर.. तर हिसकावून आणण्याची भाषा अडचणीत आणणारी, राऊतांची प्रतिक्रिया
मंत्रिमंडळ विस्तारात डावललं गेल्यावर राजीनाम्याचा विचार होता, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची कबुली, मात्र गोगावलेंसह सर्व शिंदेगट मुख्यमंत्र्यांंशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार, सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार...
भगवी टोपी घालून इतर धर्माविरुद्ध टीका करणं अयोग्य, शरद पवारांची रामगिरी महाराजांवर टीका, नितेश राणेंचं बोलणंही चुकीचं असं मत