ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 December 2024
काठमांडूतल्या माओवाद्यांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझावर...महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी फडणवीस काहीही बोलतात, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घणाघात, यात्रेत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर असल्याचा दावा
महाविकास आघाडीत असलो तरी पालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी योग्यच.. शिवसेना खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती.. स्वबळाच्या चर्चा तर भाजपसोबत असतानाही होत असल्याची आठवण
शरद पवार पुण्यातून बीडसाठी रवाना, मस्साजोगनंतर परभणीचाही करणार दौरा. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सुर्य़वंशी यांच्या कुटुंबीयाची घेणार भेट
शिंदे सरकारच्या महत्वांकाक्षी एक राज्य एक गणवेश योजनेत बदल, विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचं काम पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापनाकडेच.. निकृष्ट कापड आणि तुटपुंज्या शिलाईमुळे योजना बदलण्याची वेळ
परभणी दंगल आणि अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात भंडाऱ्यात बंद, बाजारपेठ, शाळा-कॉलेजही बंद, परभणी दंगलीच्या निषेधार्थ जालन्यातही बंद तर सोलापुरात माथाडींच्या संपामुळे लिलाव बंद,
नागपुरात वडील आणि तरुण मुलावर फर्निचर दुकानातच जीवघेणा हल्ला, ऐन अधिवेशन काळातच नागपुरात गुन्हेगारीचा आतंक