ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025

Continues below advertisement


संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप...निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायधीशांची होळी, दमानियांकडून फोटो शेअर...
राज्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, वेगवेगळ्या घटनांत आंघोळीसाठी गेलेल्या अकरा जणांचा मृत्यु, बदलापूरमध्ये चार तर देहूमध्ये तीन मुलांना काळानं गाठलं...
गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून दोन रुपयांनी वाढ, गायीचं दूध प्रतिलिटर ५८ रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर ७४ रुपयांवर
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या नावाने पैशांची वसुली केल्याचं प्रकरण...वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली. 
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी...खोक्या खोक्या हा राजकारणाचा बळी, खोक्याच्या वकिलांचा आरोप...
बुलडोझर कारवाईनंतर अज्ञातांनी केली खोक्याच्या घरातल्या सामानाची जाळपोळ, मारहाणही झाल्याचा कुटुबीयांचा आरोप, न्याय मिळण्याची केली मागणी...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप...निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायधीशांची होळी, दमानियांकडूबन फोटो शेअर...
पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण...
नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रिपदाची ऑफर...भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर, तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला...

बारामतीत 

उसाचा उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन. आज बारामतीत शरद पवार यांच्या हस्ते होणार कार्यशाळेचे उदघाटन.
'माझं काही खरं नाही' म्हणणारे जयंत पाटील शरद पवारांसह एकत्र, बारामती कृषी विज्ञान केंद्रात पाहणी...नाराज नाही, पण बाहेर बोलायची चोरी झालीय, जयंत पाटलांची प्रतिक्रिया...

बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण, पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल केला गुन्हा, जमिनीच्या वादातून मारहाण 
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता, इच्छुक महिला उमेदवाराकडून दीड लाख रुपये घेतले, मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्य़ानं युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजीत नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात जुंपली, मयत सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, रणजीत नाईक निंबाळकर यांचा पावित्रा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram