Anjali Damania on Santosh Deshmukh | अंजली दमानियांचा संतोष देशमुख प्रकरणावरून फोटोवरून नवा आरोप

Continues below advertisement

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा ट्विटद्वारे आरोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित पोलिसांसोबत जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा रंग खेळतानाचा फोटो, व्हिडीओ समोर…. 
अंजली दमानियांनी केला ट्विट…एपीबी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. 
दरम्यान, ज्या पोलिसांनी न्यायाधीशां सोबत रंग खेळला हे सगळे जण एकाच कॉलनीमध्ये राहतात

हे देखील वाचा

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा

Satara News : पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह युवकाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड (Karad) तालुक्यातील करवडी येथे घडली. एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी (Karwadi) गावावर शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (22) आणि राजेंद्र दादा कोळेकर (55) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेत जमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. 

विहिरीत पोहायला गेलेले दोन जण बुडाले

मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली. त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका, असे वडिलांनी सांगितले होते. फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.  पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram