ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 December  2024

शरद पवार आज बीड, परभणी दौऱ्यावर, बीडमधील देशमुख  कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार. तर परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनस्थळी सुद्धा शरद पवार भेट देणार

बीडमधील हत्येचं समर्थन कोणीच करत नाही, तपास सुरू आहे, दुध का दुध पानी का पानी होईल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया.  

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त, बीडच्या एसपींना नोकरीतून बडतर्फ करा,  देशमुख कुटुंबीयांची मागणी.

बीडच्या मस्साजोगमध्ये झळकले आमच्या राजाला न्याय पाहिजे, आशयाचे बॅनर, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस पूर्ण,  चार आरोपींना अटक असून 3 आरोपी अद्याप फरार.

परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार.शेतकऱ्यांनी आज शेतीमाल विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं आवाहन

नाशकात आजपासून 3 जानेवारीपर्यंत मनाई आदेश,  नवीन वर्षाचे स्वागत, भीमा कोरेगावला १ जानेवारीला होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह ६ जणांना अटक, अखिलेश शुक्लाची पत्नी गीता शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram