ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 03 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 03 August 2024
अमित शाह म्हणजे अहमदशाह अब्दालीचे वारसदार, नवाब शरीफचा केक खाणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, भाजपनं सत्ता जिहादचं हत्यार उपसल्याचा आरोप...
कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाहीत, ती अंगठ्याने चिरडायची ठाकरेंचा घणाघात...तर, उद्धव ठाकरे हताश निराश, औरंगजेब फॅन क्लबचेच असल्याचं दाखवलं, फडणवीसांची टीका...
वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेकडून नवा गौप्यस्फोट, वाझेंनी घेतलं अनिल देशमुखांसह, जयंत पाटलांचं नाव... म्हणाले, देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते...
सचिन वाझेला कधीच भेटलो नाही, मात्र फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार सुरू आहे, काही गंभीर असल्यास मला कळवतील, सचिन वाझेच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
अनिल देशमुखांनी सचिन वाझेचे आरोप फेटाळले, वाझे विश्वास ठेवण्यालायक नसल्याचं हायकोर्टाने म्हटल्याचा दिला दाखला, फडणवीसांची चाल असल्याचाही आरोप
शरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अदानी कंपनीचे २ अधिकारी बैठकीला उपस्थित असल्याची सुत्रांची माहिती, तर आमची बैठक झाल्यावर अदानींचं अधिकारी आले असावेत, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती