ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 05 July 2024

Continues below advertisement

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, नांदेड तर विदर्भातील वाशिममध्ये भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिक भयभीत

कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने वाहतूक पुन्हा बंद, मुंबईतून सुटणाऱ्या १३ एक्स्प्रेस रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले

मराठवाड्यात काल आठही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत २८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, मराठवाड्यात यंदाच्या पाऊसबळींचा आकडा २६ वर..

मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका, मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने दर उतरले, ३०
टक्के भाजीपाला पडून

मुंबईनंतर पुण्यातही सीएनजीच्या दरांमध्ये वाढ, प्रतिकिलो दीड रुपयांनी सीएनजी महागला,पुण्यात सीएनजीचा भाव आता ८५ रुपये

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ
नेत्यांना भेटण्याची शक्यता, कृषी कार्यक्रमासाठी
मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा

विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र, राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram