ABP Majha Impact | Sambhajinagar च्या Farula गावात 16 कुटुंबांना 16 लाखांची भरपाई!
Continues below advertisement
एबीपी माझाच्या बातमीचा मोठा परिणाम समोर आला आहे. संभाजीनगरच्या फारुळा गावात पाच वर्षांपूर्वी बांधलेली एक इमारत खिळखिळीत झाली होती. या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या सोळा कुटुंबांची बाजू एबीपी माझाने लावून धरली होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर बिल्डर दीपक झुनझुनवाला याने सध्याच्या बाजारभावानुसार फ्लॅटचे पैसे देण्याचे कबूल केले. काल रात्री या फ्लॅट धारकांना बिल्डरने प्रत्येकी सोळा लाखांचे चेक दिले. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सामान्य नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानले. एका फ्लॅट धारकाने म्हटले, "आपल्यामुळेच माझ्या घराचा मोबदला मिळाला आहे त्याबद्दल आपलं आम्ही आभारी आहे." एबीपी माझा केवळ बातमी दाखवत नाही तर न्याय मिळेपर्यंत सामान्यांसोबतच असतो हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement