ABP Majha Impact | नांदेडमधील शहीदाच्या मुलीला नामांकित शाळेत प्रवेश मिळणार

एबीपी माझाच्या बातमीनंतर शहीद जवान संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. शहीद कदम यांच्या मुलीला मोफत प्रवेश देण्याची तयारी नांदेडमधल्या नागार्जुन पब्लिक स्कूलनं दर्शवली आहे. सैनिकांप्रती असलेल्या आदरभावनेने मोफत प्रवेश, मोफत शिक्षण देण्याची तयारी दाखवल्याचं शाळेच्या संचालिका शैला पवार यांनी सांगितलंय. शहीद कदम यांच्या मुलीला नांदेडच्या ज्ञानमाता शाळेनं प्रवेश नाकारला होता. काश्मिरमध्ये अतिरेक्यांशी लढताना कदम शहिद झाले होते. दरम्यान, नांदेडमधल्या सैनिकांच्या विधवा पत्नीच्या मुलांना भाऊ म्हणून न्याय देणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola