ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 19 July 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भव्य सोहळा, उद्यापासून वाघनखे सर्वसामान्यांना पाहता येणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला १०० जागा लढण्याच्या तयारीत, निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी रणनीतीवर खलबतं 

महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीत दोन दिवस भाजप कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक.. कालच्या बैठकीत तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यावर चर्चा झाल्याची रावसाहेब दानवेंची माहिती. 

ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकरांना संधीची शक्यता 

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगेंची जीभ घसरली, प्रसाद लाड यांनी माझ्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा.. 

हिंगोली जिल्ह्यात असोला गावात गोळीबार, एक जखमी, गोळीबाराचं कारण स्पष्ट नाही, संतापलेल्या ग्रामस्थांनी एक बाईक, दोन ट्रॅक्टर जाळले 

जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ चारचाकी विहिरीत कोसळून अपघात, सात जणांचा मृत्यू तर ६ जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखांची मदत 

डेंग्यूचा सामना करण्यासाठी मुंबईत 'भाग मच्छर भाग' मोहीम.. महापालिकेच्या मोहिमेत सेलिब्रिटींचा सहभाग  

उत्तर गडचिरोली ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच नक्षलवादमुक्त, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नितोत्पल यांची एबीपी माझाला EXCLUSIVE माहिती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram