ABP Majha Headlines : 04 PM : 23 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा
ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी, तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया
लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेंनी टीम घेऊन यावं, लक्ष्मण हाकेंचं आव्हान.... तर १० टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्व्हे १०० टक्के बोेगस हाकेंचा आरोप
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची लवकरच बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर व्हिडीओची चौकशी करा, पराभवाच्या भीतीने आरोप करतात शंभूराज देसाईंचा पलटवार
अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल.
नाशिकातल्या काळाराम मंदिरातल्या आक्षेपार्ह व्हायरल पत्रकाप्रकरणी सरकारला मोठा संशय. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, पोलिसांकडून तपास सुरु, फडणवीसांची माहिती.
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे
येत्या ४ दिवसात मुंबई, कोकणसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार....आज सिंधुदुर्गला रेड अलर्ट...तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट
इस्रोची यशस्वी हॅटट्रिक ...उपग्रह प्रक्षेपक पुष्पकचं
तिसऱ्यांदा यशस्वी लॅंड़िंग....साडेचार किमी उंचीवरून धावपट्टीवर
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाला दणका... पहिल्या ऐतिहासिक विजयाची नोंद.. ऑस्ट्रेलियालावर २१ धावांनी दणदणीत विजय
(('हार्दिक' अभिनंदन, भारत सेमी फायनलकडे))