ABP Majha Headlines : 10.00 AM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

दुष्काळसदृष्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथील करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती, तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक

तांत्रिक बिघाड असतानाही विशाल अगरवालकडून मुलाला कार, तर ४८ हजारांची पार्टी झोडणाऱ्यांनी १ हजार ७५८ रुपये न भरल्याने कारची नोंदणी रखडली!

अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग; 

लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांची सांगलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी, पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी, कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल

उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या ६ जणांपैकी पाच मृतदेह सापडले, एकाचा शोध अद्याप सुरुच

करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला दुखापत, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

रायगडमधील १०३ गावांना दरडीचा धोका, अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, अकरावी आणि बारवीत इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola