ABP Majha Headlines : 08 AM : 06 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतील कमला मिल कम्पाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात, वायर आणि एसीला आग लागल्याने धूर कायम
ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांची पीडब्लूडी, पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक, वैतागलेल्या ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्यावर प्रशासनाला जाग..
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री वर्षा बंगल्यावर भेट, अर्धा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा
राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा...एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका... तर आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीचा सवाल...
लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरुन महायुतीत रस्सीखेच, बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदेंचा फोटो, पण अजितदादांचा फोटो नाही
विधानसभेला ६० जागा लढवण्याची इच्छा, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य..तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवणार, अजितदादांची स्पष्टोक्ती
भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी प्रसिद्ध करणार जाहीरनामा, प्रकाशनानंतर अमित शाहांची संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
रशिया-युक्रेन युद्धात भारत मध्यस्थी करु शकतो, व्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य...भारत,चीन, ब्राझीलसोबत सतत संपर्कात असल्याची पुतीन यांची माहिती..
सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या तिकिटात ३३ टक्क्यांपर्यंत कपात.. उद्यापासून नवे दर लागू होणार..
मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी एकूण ३१० गाड्यांची सोय, १६ सप्टेंबरपर्यंत गाड्यांमध्ये प्रथमोपचार चौक्यासुद्धा...
मुंबईत गणेशोत्सवादरम्यान बेस्टची २४ तास सेवा, उद्यापासून १६ सप्टेंबरपर्यंत ९ मार्गांवर २७ जादा बस चालवणार...
लालबागच्या राजाला रिलायन्स फाऊंडेशनकडून २० किलो सोन्याचा मुकुट अर्पण, पाचू रत्नजडित मुकुटाची किंमत तब्बल १६ कोटी रुपये