ABP Majha Headlines : 06 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

परभणीत संविधान शिल्पाच्या विटंबनेविरोधातल्या बंदला हिंसक वळण...अनेक ठिकाणी जाळपोळ, आणि दगडफेक...जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड...

माथेफिरूला अटक, कायदा हातात घेऊ नका,  सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका...शांतता राखा, सामाजिक सलोखा बिघडू देऊ एबीपी माझाचंही आवाहन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा दिल्लीत...फडणवीसांनी गडकरी, राजनाथ सिंहांची घेतली भेट...शिंदेंचा दौरा मात्र रद्द...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत वेगवेगळा सूर...ठाकरेंची शिवसेना आग्रही...तर मुख्यमंत्र्यांनी पद देऊ केल्यास निर्णय घेऊ, काँग्रेसची भूमिका....

मंत्रिपदावरून शिवसेनेतच धुसफूस असल्याची माहिती...काही माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध...सत्तार, केसरकर, तानाजी सावंत रडारवर...

कुर्ला बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर...अपघातानंतर प्रवाशांनी मारल्या उड्या...तर बसचालकानं क्लचऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्यानं अपघात झाल्याचं समोर...

सगल सहाव्या दिवशी काँग्रेसचं संसद परिसरातलं आंदोलन सुरूच...राहुल गांधींनी राजनाथ सिंहांना दिलं गुलाबाचं फूल...एनडीए खासदारांना गुलाब आणि तिरंगा काँग्रेस खासदारांची गांधीगिरी...

राहुरीच्या बहुचर्चित वकील दाम्पत्य हत्याकांडातील माफीच्या साक्षीदाराचा कोर्टात कबुलीजबाब, आज जिल्हा  न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार उलट तपासणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram