ABP Majha Headlines : 11 AM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
२४ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालत राजाला निरोप
पुण्यात २४ तासांपासून विसर्जन मिरवणुका सुरूच...डीजेच्या आवाजावरून पोलीस आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद ...मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलीस आग्रही
लालबागच्या राजाचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलाय, विधानसभा उमेदवारीसंदर्भात मंडळाचे सचिव सुधीर साळवींचं सूचक वक्तव्य, सुधीर साळवी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची चर्चा जोरात
महाविकास आघाडीची जागावाटपावर आज अंतिम चर्चा, दुपारी १ वाजता बैठक, मुंबईसह राज्यातील इतर जागांवर आज खलबतं
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक... पक्षांतर्गत नाराजीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
महायुतीच्या नेत्यांची बेताल बडबड सुरूच, जीभ छाटू नका, जीभेला चटके द्या... आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य,
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर आज सुनावणी, गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश नसल्यामुळे लांबणीवर पडली होती सुनावणी