ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 4 November 2024 : ABP Majha
राज ठाकरेंची भाजप वगळता उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार टीका... शिवसेना, धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांचाच तर राष्ट्रवादी आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य, राज ठाकरे कडाडले
राज ठाकरेंनी नाकारली सदा सरवणकरांना भेट... माहीममधून अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांची उमेदवारी कायम... भाजप कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार...
कोल्हापुुरात काँग्रेसवर दोनदा उमेदवार बदल्याची नामुष्की...कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंचा अर्ज मागे... अपक्ष राजेश लाटकरांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची नाना पटोलेंची माहिती
महायुती आणि महविकास आघाडीमधील बहुतांश नाराजांचे अर्ज मागे..उमरेडमधून महायुतीचे बंडखोर राजू पारवे यांची माघार.. तर एरंडोलमधून अपक्ष अर्ज भरणारे भाजपचे माजी खासदार ए.टी. नाना पाटील नॉट रिचेबल
नांदगावमधून समीर भुजबळ, अक्कलकुवामधून हीना गावितांची बंडखोरी कायम..नेवासामधून माजी भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे निवडणूक लढवण्यावर ठाम.. तर वर्सोव्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजू पेडणेकरांचा उमेदवारी अर्ज मागे नाही.