ABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

जागावाटपात अधिकच्या १० जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अमित शाहांच्या मागे लकडा...प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा भेट घेतल्याची माहिती...

कुडाळमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता.. वर्षावर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक... उदय सामंतांनीही निलेश राणेंसोबत उभं राहणार असल्याचं केलं स्पष्ट... 

महाविकास आघाडीतला मुंबईतील ३६ जागांपैकी २३ जागांचा तिढा सुटला..  ठाकरे १२, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी, समाजवादी प्रत्येकी एक जागा लढणार... 

राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इंडी आघाडीचा लाॅन्ग मार्च.. वर्षा गायकवाड, भाई जगतापांसह अनेक मोठे नेते पदयात्रेत सहभागी...

विसर्जन करण्याची गांधींची सूचना काँग्रेसने अंमलात आणली पाहिजे, आंदोलनावरुन फडणवीसांची टीका, गांधी जयंती आंदोलनाचा नाही तर आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचं मत 

शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयारांची मुक्ताफळे... म्हणाले चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना तीन नंबरचा गाळ..तर व्हिडीओ २०१९मधील असल्याचं भुयारांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram